सूचना / Update मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! | आता अमेझॉनवरही 'विश्व पांथस्थ' ई-मासिक उपलब्ध ! (Available on Amazon.com & Amazon.in) | जगभरच्या वाचकांनी पांथस्थ वेबसाईटवर नाव नोंदणी (Registration) करून घ्यावी ! | संपर्क: +91 9860678844, ईमेल: editor@panthastha.com
निसर्ग सिटी २, वाकड, पुणे, महाराष्ट्र (Wakad, Pune - 411057).. editor@panthastha.com +91 9860 67 8844
विश्व पांथस्थ - परिचय
परिचय (Introduction)

विश्व पांथस्थ – अनिवासी भारतीयांसाठी पहिले मराठी मासिक

महाराष्ट्राबाहेर आणि विशेषतः भारताबाहेर राहणाऱ्या लाखो अनिवासी मराठीजनांच्या मनात आपल्या मायभूमीविषयी, भाषेविषयी आणि संस्कृतीविषयी एक अथांग ओढ असते.

याच ओढीतून आणि मराठी माणसाच्या जागतिक कर्तृत्वाला एक सशक्त व्यासपीठ मिळवून देण्याच्या ध्यासातून 'विश्व पांथस्थ' या मासिकाचा जन्म झाला. पांथस्थ म्हणजे प्रवासी! आयुष्याच्या वाटेवर संसाराच्या, नोकरीच्या वा व्यवसायाच्या शोधात देश-विदेशात पांथस्थासारखा फिरणारा पण मनामध्ये मराठी संस्कृतीची ज्योत तेवत ठेवणारा प्रत्येक माणूस हा 'पांथस्थ' आहे.

ध्येय आणि उद्दिष्टे (Vision & Mission)

मासिकाचा मुख्य उद्देश व स्वरूप

जागतिक मराठी समाजाला वैचारिक, भाषिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडणारा महामार्ग

जागतिक मराठी संपर्क

महाराष्ट्राशी संबंधित सर्व अनिवासी मराठीजनांशी थेट संपर्क साधणे, त्यांचे विचार, समस्या, अनुभव आणि गरजा समजून घेऊन त्या सर्वांसमोर मांडणे.

साहित्य व सांस्कृतिक संवर्धन

परदेशात जन्मणाऱ्या नव्या पिढीपर्यंत मराठी भाषा, साहित्य, संस्कार व कला पोहोचवणे आणि मराठी लेखक, कवी व कलाकारांना जागतिक व्यासपीठ मिळवून देणे.

उद्योग व नेटवर्किंग

आखाती देश व पश्चिमेकडील देशांतील मराठी उद्योजक, व्यावसायिक आणि कुशल तंत्रज्ञांना एकत्र आणून व्यवसाय व रोजगाराच्या नव्या संधींची निर्मिती करणे.

प्रसार व व्याप्ती

देश-विदेशातील वितरण व वाचकवर्ग

विश्व पांथस्थ मासिकाच्या पहिल्या अंकाच्या ३,००० प्रती छापून वितरीत करण्यात आल्या होत्या. त्यानंतर छापील प्रतींसोबतच आधुनिक ई-मासिक स्वरुपात जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी संकल्प करण्यात आला.

सध्या हे मासिक यु.ए.ई. व्यतिरिक्त ओमान, बहरीन, कतार, सौदी अरेबिया, कुवेत, सिंगापूर, अमेरिका, ब्रिटन आणि भारत या देशांमध्ये नियमितपणे वाचले जाते. तसेच जगप्रसिद्ध Amazon प्लॅटफॉर्मवर ई-बुक स्वरुपातही जगभर सहज उपलब्ध आहे.

प्रमुख प्रसार क्षेत्रे (Global Footprint)

  • युनायटेड अरब अमिराती (UAE - Dubai, Abu Dhabi, Sharjah) सक्रीय केंद्र
  • गल्फ देश (Oman, Qatar, Bahrain, Kuwait, Saudi) विस्तारित
  • सिंगापूर, मलेशिया व आशिया पॅसिफिक वाचकवर्ग
  • अमेरिका (USA) व युनायटेड किंगडम (UK) ई-आवृत्ती
  • महाराष्ट्र व उर्वरित भारत मुख्यालय