विश्व पांथस्थ या मराठी मासिकाचा उद्देश मुख्यत्वे महाराष्ट्राशी संबंधित मराठीजनांशी संपर्क करण्याचा, त्यांच्या समस्या, विचार, गरजा समजून घेऊन त्या वाचकांसमोर मांडण्याचा आहे. मासिक छापून ते वितरीत करण्याचा, परिपूर्ण वेबसाईटव मोबाईलअॅपतयार करण्याचा उद्देशही जगातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे व त्यांच्या पर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचवावी व त्यांच्याबद्दल अधिकाधिक माहिती व्हावी असाच आहे . आंतरराष्ट्रीय व देश पातळीवर "विश्व पांथस्थ" हे संवादाचे एक माध्यम म्हणून लवकरच प्रस्थापित होईल असा आम्हाला विश्वास आहे.
विश्व पांथस्थ मासिकाच्या च्या पहिल्या अंकाच्या तीन हजार प्रती छापून वितरीत करण्यात आल्या. नंतर छापील प्रती कमी परंतु ई-मासिक स्वरुपात जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहचावा असे प्रयत्न आहेत. वाचकांचा या मासिकाला खूपच चांगला प्रतिसाद आहे. हा अंक यु ए ई व्यतिरिक्त ओमान, बहरीन, कतार, सौदी, कुवेत, सिंगापूर, यु के, कॅनडा, हॉलंड, अमेरिका, जपान , मलेशिया , आफ्रिका , ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, रशिया या देशात, महाराष्ट्राबाहेर भारतात व महाराष्ट्रात देखील वितरीत करण्याची योजना आहे. या सर्व ठिकाणी मराठी मंडळी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित व स्थायिक झाली आहेत.
देश विदेशातील पांथस्थांनी पुढे येऊन आपले विचार, अनुभव, समस्या व सुचना लेखाच्या स्वरुपात येथे मांडाव्या. कविता, स्फुट, मुलाखती, पुस्तक परीक्षण, प्रवास वर्णन, यशस्वी NRI व्यक्तींचे चरित्र देखील जरूर पाठवावी. विविध देशातील मराठी मंडळांना जर विशेषांक प्रकाशित करायचा असेल तर आम्हाला जरूर संपर्क करा. तुमचा ग्रुप सोशल मिडिया वर कार्यरत असेल तर सर्वांनी या वेबसाईट वर रजिस्टर करा, पांथस्थ मोबाईल अॅप प्ले स्टोर मधुन डाऊनलोड करा. सगळे लेख, विविध जाहिराती, छोट्या जाहीराती पाठवा. लवकरच वधु – वर सूचक सेक्शन देखील पांथस्थ मोबाईल अॅप वर चालू करण्याचा विचार आहे. या सर्वांचा सदस्यांनी लाभ घ्यावा.
विश्व पांथस्थ” हे अनिवासी मराठी भारतीयांसाठी अधिकृतरित्या प्रकाशित होणारे पहिले मराठी मासिक आहे. अमेरिकेत साधारण ८ लाख मराठी राहत असावेत तर जगभर साधारण २० लाख मराठी असावेत असा अंदाज आहे. आखाती देशात अंदाजे ४ लाख मराठी (महाराष्ट्राशी संबंधित) राहात असावेत व त्यातील अंदाजे दोन लाख मराठी केवळ यु ए ई (युनायटेड अरब अमिरात) मध्ये असावेत असा एक अंदाज आहे. महाराट्राबाहेर मध्य प्रदेश व गुजरात मध्ये मराठी बहुसंख्येने आहेत. जगातील २५ पेक्षा जास्त देशांत मराठी माणूस पोहचला आहे. यातील बहुसंख्य मराठी कुठल्या न कुठल्या माध्यमातून एकत्र येण्याचा प्रयत्न करतात, परंतु सर्वांपर्यंत एका पोहोचणे एक आव्हानच आहे. विश्व पांथस्थ मासिक, पांथस्थ वेबसाईट व पांथस्थ मोबाईल अॅप हा महाराष्ट्राबाहेरील व भारताबाहेरील अनिवासी मराठी भारतीयांना एकत्र आणण्यासाठी निर्माण केलेला पहिला एकमेव तटस्थ व एकसंघ अनुभव देणारा मंच आहे.
पांथस्थ व्यक्तीशी निगडीत आहेच, पण पांथस्थ एक विचार, एक जीवनशैली देखील आहे. महाराष्ट्रात न राहणारा महाराष्ट्रीअन किंवा मराठी माणुस म्हणजे पांथस्थ असे आपण म्हणतो. मुळ गाव व घर सोडून उपजीविकेसाठी जगभर गेलेला, स्थलांतरित झालेला अनिवासी भारतीय म्हणजे "विश्व पांथस्थ". महाराष्ट्र सोडून परराज्यात व परदेशात गेलेला मराठी माणुस हा देखील पांथस्थ व परराज्यातून महाराष्ट्रात उपजीविकेसाठी महाराष्ट्रात येउन "मराठी" झालेला माणुस देखील "पांथस्थ"च. या पांथस्थांचे महाराष्ट्राच्या समाजकारणात , अर्थकारणात व राजकारणात खूप महत्व आहे. त्यांच्या गरजा समजून घेणे व त्यानुसार शक्यतो एकमेकांना मदत करणे काळानुसार अत्यावश्यक झाले आहे. अर्थात पांथस्थ हा एक विचार देखील आहे. ज्याचा प्रवास सतत चालू आहे, जो अनावश्यक ओझे जवळ बाळगत नाही व जो प्रवासाचा आनंद लुटतो तो देखील पांथस्थच. आध्यात्माच्या भाषेत सांगायचे झाले तर परमात्म्यापासून अलग झालेला आत्मा, ज्याने तात्पुरते मनुष्य शरीर धारण केले आहे असा जीव म्हणजे देखील "पांथस्थ" च.
आजपर्यंत अनिवासी मराठी (किंवा नोन रेसिडेंट महाराष्ट्रीअन किंवा NRM ) च्या (म्हणजे पणजी, इंदोर, भोपाळ, बडोदा, सुरत, जुनागढ, लखनौ, कोलकता, कन्याकुमारी पासून अदिस अबाबा, लंडन, म्यूनिक, टोक्यो, टोरोंटो, मेलबर्न, मलेशिया सर्वच ठिकाणच्या) वैयक्तिक किंवा सामाजिक प्रश्नांचा उहापोह्च झाला नाही कारण त्यातील बहुतांशी समस्या समोरच आल्या नाहीत . मग त्यावर उपाय शोधणे दूरच. NRM ची एक समूह म्हणून देखील फारशी ओळख निर्माण झाली नाही, कारण त्यांना एकत्र आणण्याचा फारसा प्रयत्न झाला नाही. काही ठिकाणी महाराष्ट्र मंडळा सारख्या संस्था निर्माण झाल्या, पण त्यांचे उद्दिष्ट व पोहोच मर्यादित राहिली. मंडळात येणारी "मंडळी" एकमेकांना खुपदा फक्त चेहऱ्याने ओळखतात, काही जण नावाने ओळखतात . कालांतराने कौटुंबिक ओळख निर्माण होते, परंतु अधिकांशी मंडळी आपल्या कोशातून बाहेर येऊन निर्मळ सामाजिक संवाद साधतांना दिसत नाहीत. असा संवाद होणे हि आता काळाची गरज आहे . याच गरजेतून "पांथस्थ" या मंचाची निर्मिती झाली आहे. पांथस्थ च्या माध्यमातून NRM संबंधात अनेक गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत. एकमेकांची ओळख करून घेणार आहोत , विचारांची देवाण घेवाण करणार आहोत, जमेल तशी एकमेकांना मदत हि करणार आहोत, म्हणजे असा उद्देश आहे . यात सर्व NRM अर्थात पांथस्थ अर्थात अनिवासी मराठी मंडळीचा उस्फुर्त सहभाग अपेक्षित आहे.
एक जाहिरातदार म्हणून तुम्हालाही या सर्व लोकांपर्यंत पोहोचावे असे निश्चित वाटत असेल. तेव्हा "विश्व पांथस्थ" चा माध्यमातून तुम्ही किफायतशीर रित्या या सर्व लोकांसमोर आपले उत्पादन, प्रकल्प किंवा सेवा (प्रोडक्ट, प्रोजेक्ट किंवा सर्विस) व्यवसाय किंवा कंपनी याबद्दल माहित पोहोचवू शकता. बांधकाम व्यावसायिक व गृह योजना, (Builders, रिअल ईस्टेट), वैद्यकीय सेवा (Hospitals, मेडिकल व हेल्थ केअर), शैक्षणिक संस्था व सेवा (Education Institutes), पर्यटन (Travel व Tourism), रेस्टोरंट, हॉटेल व Hospitality, सर्व उद्योग व उद्योजक, खासगी व सरकारी योजना, सामाजिक संस्था या सर्वांसाठी अनिवासी मराठी भारतीयांपर्यंत पोहोचण्याची "विश्व पांथस्थ" ही एक सुवर्णसंधी आहे . यापूर्वी कदाचित असा मंच उपलब्ध नसल्याने तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहचला नसाल, पण आता हि संधी आहे. तेव्हा आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा, "विश्व पांथस्थ" साठी जाहिरात देऊन या उपक्रमाला प्रोत्साहन द्यावे आणि "विश्व पांथस्थ" च्या सर्व उपक्रमात आनंदाने सहभागी व्हावे ही नम्र विनंती.